F - Faithful
A - Admiration
T - Thankful
H - Humble
E - Endurance
R - is for being the "Rock"
that holds the family together !!

Tuesday, September 7, 2010

बाळकृष्ण पद्माक्ष

खूप दिवस झाले, पद्माक्ष बदल लिहिण्याचा योग नाही आला. त्यामुळे थोडा चुकचुकल्या सारखा वाटत होतं. मागील २-३ महिने त्याची वाढ होतांना बघतोय, फारच आनंद होतो. त्याचे दुडूदुडू रांगण बघून फारच कौतुक वाटत. सध्या तो आधार घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. पालक म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे कुतूहलानी बघतो आणि अनुभवतो.


त्याच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक आवाजामध्ये आम्ही नाविन्य शोधत असतो. तो काय सांगायचा प्रयत्न करतो आहे हे जाणून घेण्यात एक निराळीच मजा असते. :)


पण जीव कधी कधी हळहळतो जेव्हा तो धरपडतो. :( दोन छोट्याश्या दातांनी तो चावतो आणि जर आपण दर्शवला कि आपल्या बोटाला लागला आहे तर खुदकण हसतो. :D

जन्माष्ठामीच्या दिवशी त्याने फारच धमाल केली. त्या दिवशीचे काही टिपलेले क्षण.